शरद पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा तब्बल 30 वर्षांनी जुळून आला योग; सुतक कालावधी काय असेल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आले आहे. खास गोष्ट म्हणजे, या चंद्रग्रहणाचा योग तब्बल 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी आला आहे. यामुळे वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाविषयी लोकांकडून आणि तज्ञांकडून देखील जास्त उत्सुकता दाखवली जात आहे. आपल्या समाजात सूर्यग्रहण/ चंद्रग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातून देखील पाहिले जाते. या कारणामुळेच चंद्रग्रहणाच्या वेळी अनेकजण सुतक पाळतात. त्यामुळेच आज आपण सुतकाचा कालावधी आणि चंद्रग्रहण याविषयी जाणून घेणार आहोत घेणार आहोत.

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबर रोजी आले आहे. हा योग तीस वर्षानंतर जुळून आला असल्यामुळे संपूर्ण भारतात 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण दिसणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:05 वाजता चंद्रग्रहणाला सुरूवात होईल आणि 02:24 वाजता समाप्त होईल. त्याचबरोबर, सुतक दुपारी 4 च्या सुमारास सुरू होईल आणि चंद्रग्रहण संपेपर्यंत चालू राहील. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की ग्रहण काळात नकारात्मक शक्ती वास करतात, यामुळे गर्भवती महिलांनी अशा काळात जास्त काळजी घ्यावी. तसेच पुढील गोष्टी करणे टाळाव्यात

ग्रहणात गर्भवती महिलांनी टाळाव्यात या गोष्टी

1) चंद्रग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर जाणे टाळावे आणि कोणतेही जड कामे करू नयेत.
2) गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि आपल्यावर चंद्राची किरणे पडून देऊ नयेत
3) सुतकाच्या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी शिळे अन्न खाऊ नये
4) या काळात गर्भवती महिलांनी कापणे, चिरणे, कपडे धुणे अशी कामे करू नयेत.
5) चंद्रग्रहणाच्या काळात महिलांनी सकारात्मक गोष्टींचा विचार करावा आणि देवाचे स्मरण करावे.