वैद्यकीय अधिकारी 1 हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जत तालुक्यातील बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात लाचलुचपत विभागाने पकडले आहे. डॉ. प्रमोद मारूती कांबळे (वय- 46, रा. शिवाजी पेठ, जत, ता. जत) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. जत पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बिळूर येथे प्रमोद कांबळे हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी मोफत उपचार असतानाही एक हजार रुपयांची मागणी केली होती. पैशाची मागणी केल्याने संबंधित तक्रारदार याने सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वैद्यकीय अधिकारी कांबळे यांना रंगेहात पकडले.

सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक, सुजय घाटगे, दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, कलगुटगी, अजित पाटील, सलिम मकानदार, रविंद्र धुमाळ, बाळासाहेब पवार या पथकाने कारवाई केली.