औरंगाबाद | मोबाईल हिसकावून नेणाऱ्या या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. रस्त्याने फिरणाऱ्या तसेच पायी चालणाऱ्या तरुण, वृद्धांचे मोबाईल विकल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पॅटर्न लॉक उघडत नसल्याने त्यांनी चोरलेली सर्व मोबाईल स्वतः जवळ ठेवल्याचे चौकशीत समोर आले आहे.
अर्जुन राजेश दनके आणि अजय किशोर जाधव (दोन्ही राहणार वाळूज) अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांचा साथीदार असलेल्या अल्पवयीन बालकांना ताब्यात घेत पोलिसांनी मोबाईल जप्त केले. तर त्यांचा तिसरा साथीदार स्वप्निल केदारे हा पसार असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे त्यांच्याकडून दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी यांचा सावरकर चौकात या दोघांनी मोबाईल चोरी केला होता. या वेळी दोघांनी अवघ्या तीन सेकंदात सावरकर चौकातून क्रांती चौक पोलिस ठाण्यात समोरील बंडू वैद्य चौक गाठला होता. या घटनेनंतर खोकड पुरा भोईवाडा या भागातून देखील मोबाईल चोरीला गेल्याचे प्रकार समोर आले होते या प्रकरणाचा गुन्हे शाखा पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास सुरू केला.