Navratri 2023: दांडिया कार्यक्रमात वाजणार नरेंद्र मोदींचं गाणं; ‘गरबो’ गाण्यावर थिरकणार पाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबो गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 190 सेकंदाचे गरबो गीत लिहिले होते. आता या गीताचा म्युझिक व्हिडिओ नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी रिलीज करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी लिखित गरबो गाण्याला ध्वनी भानुशाली हिने गायले आहे. ज्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरबो गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ युट्युबवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की, पीएम मोदींनी लिहिलेल्या ‘गारबो’मध्ये तनिष्क बागचीच्या आवाजाची आणि ध्वनी भानुशालीच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे. संगीताची ही जादू नवरात्रीच्या काळात गुजरातची संस्कृती पाहण्याची प्रेरणा देते. या गाण्याला नदीम शाह यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमची टीम तयार करा, तुमचा दांडिया आणि घागरा तयार करा आणि ‘गारबो’ हे तुमचे नवरात्रीचे खास गाणे बनवा.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गाण्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या गाण्याला कॅप्शन देत मोदींनी म्हटले आहे की, मी वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्याच्या या सुंदर गाण्याचे सादरीकरणासाठी करण्यासाठी @dhvanivinod, तनिष्क बागची आणि @Jjust_Music च्या टीमचे आभार! या गाण्यातून अनेक आठवणी जाग्या होतात. मी आता बरीच वर्षे काही लिहिले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून मी एक नवीन गरबा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याला नवरात्रीत शेअर करेल.

दरम्यान, राज्यात नवरात्र उत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. तसेच नवरात्र उत्सवाच्या काळात अनेक दांडिया कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदींचे गीत वाजेल हे नक्कीच आहे. सध्या तरुणांकडून या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या गाण्याला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे.