हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतेच शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शिक्षण पद्धतीतील नव्या बदलांची अंमलबजावणी केली आहे. या नव्या नियमानुसार आता राज्यातील शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष एप्रिलऐवजी जूनपासूनच सुरू होणार आहे. तसेच, यंदा शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार असून तो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) धर्तीवर तयार केला जाणार आहे. शिक्षण संस्थेच्या या नव्या नियमानमुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शालेय शिक्षण विभागाचा खुलासा
बदलत्या नियमांबाबत स्पष्टीकरण देताना शालेय शिक्षण विभागाने म्हणले आहे की, शाळांचे वेळापत्रक जुनपासूनच सुरू राहणार असून केवळ पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. हा अभ्यासक्रम राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार केला जात आहे. जो सीबीएसईच्या धर्तीवर बनवलेला असेल. तसेच, इतर वर्गांसाठी कोणताही बदल होणार नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
पहिलीच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या बदलांविषयी माहिती देताना सांगितले की, पहिली आणि शक्य झाल्यास दुसरीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी नवी पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. तर अध्यापन पद्धतीत बदल केले जातील. मात्र, याचा परिणाम शाळांच्या वेळापत्रकावर होणार नाही आणि शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील.
दरम्यान, राज्य सरकारने शालेय शिक्षण प्रणाली अधिक आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करण्यासाठी हे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार होणारा हा अभ्यासक्रम सीबीएसईच्या पद्धतीनुसार असेल. मात्र तो राज्य शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचा लाभ मिळेल. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतही मदत होईल. महत्वाचे म्हणजे, यंदाच्या वर्षापासून शाळा या जूनमध्येच सुरू होणार आहेत. तसेच, पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होईल, त्यामुळे या सगळ्याबाबत पालक काय प्रतिक्रिया देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.