औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेत घाटीतील रद्द झालेली एमसीएच विंग पुन्हा मिळावी यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी अमित देशमुख यांना एम सी एच विंग ची सर्व कागदपत्रे सादर केली होती. परंतु आता हे एमसीएच विंग घाटीत होणार नसून नवीन रुग्णालयात होणार आहे.
शासकीय दूध डेअरी जवळ नव्याने एमसीएच म्हणजे माता व बाल संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे. परंतु हे केंद्र परत मिळवण्यासाठी घाटीकडून प्रयत्न केले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडून 200 बेडचे केंद्र नवीन रुग्णालयातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर या केंद्राच्या बांधकामासाठी निधी देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.घाटी रुग्णालयात दरवर्षी 19 हजार प्रसूती होतात. परंतु सध्या सुविधांचा अभाव आणि आणखी उत्तम उपचार मिळण्यासाठी तीन वर्षापूर्वी केंद्र समितीकडून एमसीएच विंग उभारण्याची सूचना देण्यात आली होती. याबाबत प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. परंतु काही त्रुटी अभावी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
या केंद्राबाबत बरेच वादविवाद समोर आले होते. म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला असून एमसीएच विंग घाटीत होणार नसून नवीन रुग्णालयात होणार आहे. ‘एनआरएचएम’ ने वैद्यकीय विभागाला एमसीएच मंजूर केली होती त्यासाठी 38 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला यांचे महत्त्व समजलेच असे नाही. त्याचबरोबर वारंवार त्रुटी काढत हा प्रकल्प लांबवत गेला. शेवटच्या टप्प्यात पुन्हा याबाबतचे प्रस्ताव वैद्यकीय संचालकांनी दोन दिवसांपूर्वीच आघाडीकडून मागवण्यात आले होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे राजेश टोपे यांनी सांगितले.