Corona रुग्णांचा आकडा 60 हजारांपार; काल 27 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूची (Corona Virus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 9,111 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 27 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीनुसार, सध्या देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजारांपार गेली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या (Covid 19) सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरु आहे. एका दिवसापूर्वी संक्रिय रुग्णांचा आकडा 57,542 होता मात्र यामध्ये आता भर पडली असून हाच आकडा 60,313 वर गेला आहे. त्यातच भीतीदायक म्हणजे २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात आत्तापर्यन्त कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 5,31,141 वर पोहोचली आहे.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेच आहे तसेच केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.