व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चेहरा माणसाचा अन् पाय शहामृगाचे; ‘या’ जमातीतील लोक आहेत दुर्मिळ आजाराशी ग्रस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या जातीचे, वंशाचे, धर्माचे लोक वावरत आहेत. या लोकांमध्ये काही वेगळे बदल देखील आढळून आले आहेत. आपल्या पृथ्वीवर, वजनाने खूपच किरकोळ, उंचीने खूपच मोठा तर खूपच लहान, दोन शरीर वेगळे मात्र देह एकच असे कित्येक लोक राहत आहेत. मुख्य म्हणजे, आता या सगळ्यांसोबत चेहरा माणसाचा पण पाय शहामृजंगासारखे असे व्यक्तीही आढळून आले आहेत. अशा व्यक्तींची संपूर्ण एक जमातच एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. या जमातीचे नाव “वडोमा” असे आहे, जे झिम्बाब्वेच्या उत्तरेकडील कान्येम्बा प्रदेशात राहते.

वडोमा जमातीचा अनुवंशिक आजार

वडोमा जमातीतील लोक एका अनुवंशिक आजाराने ग्रस्त आहेत. ज्या आजाराचे नाव इक्ट्रोडॅक्टिली’ किंवा ‘ऑस्ट्रिच फूट सिंड्रोम’  असे आहे. दुर्मिळ आजारानुसार याला, इक्ट्रोडॅक्टिलीला स्प्लिट हँड/फूट विकृती (SHFM) असे देखील म्हटले जाते. हजार एक अनुवंशिक असून तो पायांच्या बोटांना होतो. या आजारांमध्ये त्यांची बोटे लांब सडक वाढत जातात. तसेच, या बोटांमध्ये एक अंतर निर्माण होते, ज्यामुळे ते फाकले जातात. मुख्य म्हणजे, या जमातीच्या लोकांची जन्मताच एक किंवा दोन बोटे गायब झालेले असतात.

इतर जमातीत लग्न करण्यास बंदी

वडोमा जमातीच्या माहितीनुसार, त्यांच्यातील चार पैकी एकातरी मुलाला या आजाराचा सामना करावा लागतो. यांच्यामध्ये बहुतेक लोकांची मधली तीन बोटेच गायब असतात. जी आतून किंवा बाहेरून वगळली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या लोकांना त्यांच्या जमाती बाहेर लग्न करण्यास बंदी आहे. या रोगाचा फैलाव दुसऱ्या जमातीच्या लोकांमध्ये पसरू नये, यासाठी वडोमा जमातीमधील लोक आपल्या जमातीतील लोकांशी लग्न करतात. परंतु काही लोकांनी दुसऱ्या जमातीत लग्न केल्यामुळे हा आजार इतर जमातींमध्ये देखील दिसून आला आहे.

शिकार करणे, झाडावर चढणे सोपे होते

वाळवंटातील तळोंडा किंवा तालौते कलंगा अशा जमातींमध्ये हा आजार आढळला आहे. असे म्हणतात की, हे लोक डोमा जमातीशी वंशज आहेत. विशेष म्हणजे या जमातीतील कोणत्याच व्यक्तीला आपल्या स्थितीचे अपंगत्व वाटत नाही. वडोमा जमाती आपल्या प्रमाणेच सर्व गोष्टी करते. त्यांना आपल्याला असलेल्या आजाराची कोणतीही लाज वाटत नाही. ते या स्थितीकडे एक ताकद म्हणून पाहतात. या जमातीतील लोकांचे शहामृगासारखे पाय असल्यामुळे त्यांना झाडांवर चढणे, शिकार करणे, मासे मारणे, मध गोळा करणे अगदी सोप्या पद्धतीने करता येते.