औरंगाबाद – उद्योग नगरी वाळुज एमआयडीसीला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणातून निघालेल्या मुख्य पाईपलाईन मध्येच हा बिघाड झाला आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
पाईप लाईन फुटल्यामुळे त्यातून बाहेर पडणारे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती शेंदूरवादा गावाजवळ ही पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळाली आहे.
जायकवाडी धरणातून वाळुज एमआयडीसी ला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी मोठ्या दाबाने रस्त्यावर आले. या पाण्याच्या प्रेशर मुळे औरंगाबाद पाटोदा वाळूज हा रस्ता खचला असून, या खचलेल्या रस्त्यात एक मालवाहू ट्रक ही अडकला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला.