मोठी बातमी! तब्बल 379 प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज टोकियोच्या हनेडा विमानतळावर जापान एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. या विमानामध्ये आग लागली तेव्हा 379 प्रवासी होते. मात्र या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. अचानकपणे विमानाला आग लागल्यामुळे, हनेडा विमानतळावर गोंधळ उडाला आहे.

जपानच्या एका वृत्तानुसार, एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण आग लागल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. यानंतर त्वरित अग्निशामक दलाला विमानतळावर बोलावून घेण्यात आले. तसेच, विमानात अडकलेल्या 379 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सांगितले जात आहे की, जपान एअरलाइन्सच्या विमानाला कोस्ट गार्डच्या विमानाशी टक्कर दिल्यामुळे ही आग लागली आहे. मात्र अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर टोकियोच्या विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विमानाच्या खिडकीतून आगीचे भडके उडताना दिसत आहेत. त्यातून ही दुर्घटना किती भीषण होती, याचा अंदाज येत आहे. मुख्य म्हणजे, विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास जपान पोलिसांकडून सुरू आहे.