रेल्वेमधील अस्वच्छता आणि दुर्गंधीचा प्रश्न मिटणार! प्रवाशांसाठी रेल्वेची नाविन्यपूर्ण योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य भारत रेल्वे विभाग आपल्या प्रवाशांसाठी नेहमी वेगवेगळ्या सुविधा राबवताना दिसते. आता पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुखकर प्रवासाचा विचार करून एक्झिक्युटिव्ह कोचमधील शौचालयांमध्ये गंध सेन्सर्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे सेन्सर चाचणीच्या आधारावर बसवण्यात आले आहेत. या सेन्सरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे. खरे तर, स्वच्छतेच्या दृष्टीने रेल्वे विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दररोज मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचच्या शौचालयांमध्ये गंध सेन्सर्स बसवले आहे. सध्या हे सेन्सर फक्त चाचणीच्या आधारावर लावण्यात आले आहेत. हे सेन्सर शौचालयाच्या वातावरणातील गंध पातळीचे परिक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे वासाच्या तीव्रतेत पुन्हा वाढ झाल्यास सेन्सर्स तत्काळ हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना संदेश देईल.

या सेन्सरकडून संकेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना तातडीने त्या ठिकाणी पोहोचता येईल. तसेच कारवाई करण्यासाठी सोपे जाईल. मुख्य म्हणजे, पुढे जाऊन हे गंध सेंसर इतरही डब्यांमध्ये बसवण्यात येतील. ज्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये प्रवाशांचा प्रवास स्वच्छ सुगंधीत आणि सुखकर होईल.