राज्यात कंत्राटी नोकर भरती प्रक्रियेला सुरुवात; या खाजगी कंपन्यांवर मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मोठ्या प्रमाणात कंत्राट तत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही खाजगी कंपन्यांना कंत्राट देखील देण्यात आले आहे. सध्या कंत्राट तत्वावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्यामुळे याला राज्यातील तरुणांकडून विरोध दर्शवला जात आहे. मात्र तरीदेखील सरकारकडून नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून 86 संवर्गातील जागा भरण्यात येणार आहेत. यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळतील परंतु त्या परमनंट बेसवर नसतील.

कंत्राट देण्यात आलेल्या कंपन्यांची नावे

1) उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा.लि.
2) सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा.लि
3) सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा.लि
4) एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि.
5) इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.
6) क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.
7) अँक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड
8) सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.
9) सी.एस.ई.- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि.

या 9 कंपन्यांच्या मार्फत कंत्राटी तत्त्वावर 86 संवर्गातील जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती पाच वर्षांसाठी करण्यात येणार आहे. तसेच या भरतीला कोणत्याही आरक्षण लागू नसेल. त्यामुळे ही भरती सरळ सेवेच्या माध्यमातून करण्यात येईल. या भरती प्रक्रियेमध्ये 23 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतचे पगार असलेल्या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

दरम्यान, राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढत असताना सरकारकडून कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात येत आहे. त्यामुळे तरुण वर्ग या निर्णयाबाबत आक्रोश व्यक्त करत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये कंत्राटी तत्वावर उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. मात्र नोकरीचा कार्यकाळ कमी असल्यामुळे तरुणांसमोर पुढील प्रश्न उभे राहत आहेत. अशातच आता 9 कंपन्यांकडे 86 संवर्गातील जागा कंत्राट देण्यात आलं आहे.