सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. त्यामुळे या वयात वाढ करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. लवकरच राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करू शकते. याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये अनेक बदल आहेत. मुख्य म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे आहे तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय फक्त 58 वर्षे आहे. त्यामुळे निवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे सध्या या मागणीवर सरकार विचार करत आहे.

नुकतीच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयासंदर्भातला मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावर बराच वेळ चर्चा देखील झाली. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार कर्मचाऱ्यांना याबाबत दिलासा देणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे होईल.