रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; असे पार पडतील सर्व कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वच रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या खास सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. आता या सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार, 16 ते 22 जानेवारीदरम्यान अयोध्येत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. हे कार्यक्रम कोणते आणि कोणत्या दिवशी असतील, जाणून घेऊयात.

कार्यक्रमाचे वेळापत्रक

16 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे.

17 जानेवारी रोजी श्रीविग्रह परिसरात मिरवणूक काढण्यात येईल आणि गर्भगृहाचे शुद्धीकरण केले जाईल.

18 जानेवारीपासून अधिवास सुरू होईल. दोन्ही वेळी जलाधिवास, सुगंध आणि गंधअधिवास असेल.

19 जानेवारी रोजी सकाळच्या वेळी फळ आधिवास आणि धान्य अधिवास होईल.

20 जानेवारी रोजी सकाळी फुले आणि रत्ने तसेच संध्याकाळी घृत अधिवास असेल.

21 जानेवारी रोजी सकाळी साखर, मिठाई व मध अधिवास असेल. तसेच, औषध व शैय्या अधिवास देखील होईल.

22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीवरील डोळ्याची पट्टी काढून त्यांना आरसा दाखवला जाईल.

अशा प्रकारे 16 ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडेल.