शोकांतिका! मुलानेच काढले बापाला विकायला, घराच्या बाहेर लावली पाटी, ‘Father For Sale’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज कालच्या मुलांना आपल्या आई-वडिलांविषयी जास्त माया राहिलेली नाही असे सतत म्हणले जाते. ही माया  कमी झाल्यामुळेच जास्त प्रमाणात आई वडील घराऐवजी वृद्ध आश्रमात दिसून येतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आता परिस्थिती एवढी विकट झाली आहे की, मुल थेट आई वडिलांना विकायला काढू लागले आहेत. तुम्हाला या गोष्टीवर नक्कीच विश्वास बसणार नाही, परंतु एका 8 वर्षाच्या मुलाने चक्क सतत होणाऱ्या वादामुळे आपल्या वडिलांना विकायला काढले आहे. यासाठी त्याने आपल्या घराच्या दारावर Father For Sale अशी पाटी देखील लागली आहे. सध्या सोशल मीडियावर हीच पाटी व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियाच्या Melancoholic या ट्विटर अकाऊंटवर आपल्या वडिलांना विकण्यासाठी लावण्यात आलेल्या पाटीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पाटीवर स्पष्ट भाषेत लिहिले आहे की, “मी माझ्या वडिलांना 2 लाख रुपयांत विकायला काढले आहे. कोणाला ते हवे असल्यास घराची बेल वाजवावी.” या पाटीला वाचून सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी या सर्व प्रकारावर शोकांतिका व्यक्त केली आहे. आजच्या जगात मुलांना वडिलांविषयी प्रेम राहिले नाही हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान व्हायरल पोस्ट Melancoholic अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला Caption देण्यात आले आहे की, “किरकोळ वादातून आणि एका 8 वर्षांच्या मुलाने त्याच्या वडिलांना विकण्यास काढलेली नोटीस घराबाहेर चिकटवली आहे. मला कळून चुकलं आहे की माझी किंमत उरलेली नाही” या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच या पोस्टला खूप लोकांकडून शेअर करण्यात आले आहे.