पुणे आणि आसपासच्या भागातील कनेक्टिव्हिटी साठी काही लोकलस चालवल्या जातात. यातील महत्वाची लोकल म्हणजे पुणे -लोणावळा या मार्गावरील लोकल. आता पुणे -लोणावळा रेल्वे मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ब्रह्मप्रतिक्षित पुणे लोणावळा तिसऱ्या, चौथ्या रेल्वे लोकल मार्गीकेचा निम्मा खर्च राज्य सरकार करणार असून या संदर्भातील प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केली असल्याची माहिती आहे त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवेचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पुणे लोणावळा मार्गिका तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव रखडला आहे. सुरुवातीला ही मार्गिका तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासन निम्मा खर्च, राज्य शासन 25% आणि उर्वरित 25% खर्च पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनानं करावा असं ठरलं होतं. मात्र दोन्ही महापालिकांनी या प्रकल्पासाठी निधी देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतील प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे सांगितलं होतं. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारी या प्रकल्पातील निम्मा खर्चाचा वाटा उचलणार असल्याचे समजत असून मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रस्तावावर सही केल्याच समजते त्यामुळे पुणे मुंबई दरम्यान होणारी रेल्वे गाड्यांची कोंडी कमी होणार असून रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
याबाबत माहिती देताना खासदार व केंद्रीय हवाई राजमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की पुणे लोणावळा तिसऱ्या मार्गेगेच काम मार्गी लागावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी याबाबतच्या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वीच सही केली आहे अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे.