नवविवाहित तरुणाची आत्महत्या; एका महिन्यापूर्वी झाल होत लग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन कन्नड तालुक्यातील सारोळा येथील एका नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या तरुणांची औरंगाबाद येथील एचएससी, एसएससी बोर्डात लिपीक पदावर निवड झाली होती. नोकरीवर जाण्याअगोदरच त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विठ्ठल गोटीराम बिघोत (वय 33) रा. सारोळा, ता. कन्नड असे मृताचे नव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार विठ्ठल हा सारोळा गावाजनीक बौद्धवाडी शुक्रवारी संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर विठ्ठल कुटुंबसह झोपी गेला. रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान पतीने घरातच पंख्याला दोरीन गळफास घेतल्याचे पत्नीचा निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी येऊन विठ्ठल याला ग्रामीण रुग्णालय पिशोर येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले शनिवारी सकाळी नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

विठ्ठल याचे मागील महिन्यातच 4 मे रोजी लग्न झाले होते. त्याची एसएससी बोर्डात लिपिक म्हणून निवड झाली होती. नोकरीवर जाण्या अगोदरच ही घटना घडली. त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. याबाबत पोलीस पाटील योगेश लेणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पिशोर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार वसंत पाटील बजाजनगर येथील पोलीस नाईक शिवदास बोरडे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment