Jio आणि Airtel चे टेन्शन वाढले ! BSNL ने बाजारात आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; पहा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL Recharge Plan : भारतीय बाजारात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांची स्पर्धा सुरु आहे. यामध्ये टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणतात. मात्र सध्या रिचार्जच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांचा खिसा मोकळा होत आहे.

अशा वेळी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी एक खास प्लॅन घेऊन आले आहे. यामध्ये बीएसएनएलचे असे दोन प्लॅन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 395 दिवसांचा डेटा मिळतो. कंपनीचे हे प्लॅन 2399 आणि 2999 रुपयांचे आहेत. यामध्ये तुम्हाला 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 395 दिवसांच्या वैधतेसह इंटरनेट वापरासाठी दररोज 2 GB डेटा देत आहे.

हा प्लॅन दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इरॉस एंटरटेनमेंटमध्ये मोफत ऍक्सेस मिळेल. तसेच 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी मोफत PRBT सबस्क्रिप्शनही मिळते. 2999 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 395 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा मिळेल. हा प्लान देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील देतो. यामध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. BSNL चे हे प्लॅन इंटरनेट स्पीडच्या बाबतीत खाजगी कंपन्यांच्या मागे आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये 5G स्पीड मिळणार नाही.

जिओ आणि एअरटेलचा 2999 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनसह कंपनी 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देखील देत आहे. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल. हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील देतो. दररोज 100 मोफत एसएमएस देणार्‍या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema चाही मोफत ऍक्सेस मिळेल.

त्याच वेळी, एअरटेलचा 2999 रुपयांचा प्लॅन देखील 365 दिवस चालतो. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळेल. तसेच कंपनीच्या 5G नेटवर्क क्षेत्रात राहणाऱ्या वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. हा प्लान अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील देतो. यामध्ये तुम्हाला अनेक आश्चर्यकारक अतिरिक्त फायदे देखील मिळतील. अशा प्रकारे ग्राहकांसाठी हा एक सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन आहे.