ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही धक्कादायकी रीत्या वाढत आहे. अशाच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारकडून लसीकरणाची मोठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार अशी माहिती देखील सूत्रांनी कळवली आहे.

ऑगस्ट महिन्यखेर लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. अशातच ठाकरे सरकारने मोफत लस देण्याची योजना आखली आहे. या दरम्यान महिन्याला दोन कोटी लस विकत घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार covid-19 संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी सुमारे ५. ५० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देखील सरकारने आखले आहे.

कोणाकडून किती लसींचा पुरवठा

या मोहिमेत देशातील दोन महत्त्वाच्या लस कंपन्यांकडे सरकारने मागणी केली आहे, एक म्हणजे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ची कॅव्हिडशील्ड आणि दुसरी म्हणजे भारत बायोटेकची कोवाक्सिन लस. या मोहिमेकरिता सिरम कडे दर महिन्याला दीड कोटी कोटी लसींची मागणी राज्य सरकारने नोंदवली आहे. मात्र त्यातील एक कोटी लसी मिळणार आहेत. त्याचबरोबर भारत बायोटेककडे महिन्याला एक कोटी कॅव्हॅक्सिन लसींची मागणी नोंदवली आहे. पण भारत बायोटेक कडून सुमारे 50 ते 60 लाख लसी मिळणार आहेत. तर उर्वरित 50 ते 60 लाख लसी या आंतरराष्ट्रीय बाजारातून राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबद्दल लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृतरीत्या घोषणा करणार आहेत.

दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यात मोफत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच लसी संदर्भात ग्लोबल टेंडर देखील काढणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती.

Leave a Comment