उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये; या 6 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये मैदान जिंकण्यासाठी ठाकरे गट जोमाने कामाला लागला आहे.  या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटाने सहा 6 नवनियुक्त नेत्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. नव्या कार्यकारिणीच्या विस्तारमध्ये आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू या सर्व नेत्यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर, ठाकरे गटाने नव्या कार्यकारिणी विस्तारामध्ये पक्षाचे उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नव्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये, उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांचा समावेश आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे सचिव म्हणून सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर, आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाने नव्या नियुक्तीत नेतेमंडळीमध्ये देखील एकूण 16 जणांचा समावेश केला आहे. यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश असेल अशी माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर आणि आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाने कार्यकारणीचा विस्तार केला आहे. या विस्ताराच्या मागे, राज्यात पक्षवाढीस बळकटी मिळावी, असा हेतू ठाकरे गटाचा आहे. त्यामुळेच ठाकरे गटाने कामाचा वेग वाढवला आहे. त्यासाठीच, नेते मंडळासहित संघटन पदी नव्या नियुक्त्या केल्या आहेत.