शेतकऱ्यांच्या विहीरीवरील इंजिन चोरणाऱ्यास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वांझोळी (ता. खटाव) येथील विहिरीवरील इंजिन चोरणाऱ्यास तासगाव (जि. सांगली) येथील 19 वर्षीय संशयित युवकाला पकडण्यात औंध पोलिसांना यश आले आहे. कपिल प्रकाश शिंदे असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, वांझोळी या.खटाव येथील शेतकरी कुंडलिक मगर यांच्या शेतातील विहिरीवरील उषा कंपनीचे इंजिन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या इंजिनाची किंमत सुमारे 50 हजार रुपये आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज व अन्य स्त्रोतांची पडताळणी करून तासगाव (जि. सांगली) येथून संशयित आरोपी कपिल शिंदे यास औंध पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे. यावेळी 50 हजार रुपये किमतीच्या इंजिनसह 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा टाटा एस (छोटा हत्ती टेम्पो) असा एकूण 4 लाख रुपयांचा ऐवज औध पोलिसांनी जप्त केला आहे.

या तपासकार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पो. ना. प्रशांत पाटील, बापूसाहेब जाधव, राहुल वाघ, काजल साबळे, अश्विनी साळुंखे, पाडळे, हिरवे, कोळी, जाधव यांनी सहभाग घेतला.