हा काय प्रकार…? ट्रेन उलट्या दिशेने अर्धा तास धावत होती आणि ड्रायव्हरला कळलंच नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेट्वर्कस पैकी एक आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. आरामदायी आणि वेगवान प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे पहिले जाते. मात्र मागच्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाला एका मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ते म्हणजे रेल्वेचे वारंवार होणारे अपघात. नुकत्याच मिळलेल्या माहितीनुसार कोलकत्ता हून अमृतसर कडे जाणारी ट्रेन सुदैवानं दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचली आहे.

नक्की काय घडलं ?

त्याचं झालं असं की ही ट्रेन सुमारे अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटांपर्यंत उलट दिशेने धावत राहिली. ही ट्रेन जालंधर स्टेशन पासून उलट दिशेने धावत राहिली आणि त्यानंतर नकोरडा जंक्शन इथे पोहोचल्यानंतर ट्रेन चुकीच्या पद्धतीने धावत असल्याची ड्रायव्हरला माहिती झाली. त्यानंतर मात्र इंजिन बदलून ट्रेन परत मार्गावर आणण्यात आली. ट्रेन उलट्या पद्धतीने धावत आहे हे ड्रायव्हरला जरी कळालं नसलं तरी प्रवाशांना मात्र याची जाणीव होती आणि प्रवासी मात्र जीव मुठीत घेऊन बसले होते. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर या घटनेबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र सुदैवानं मोठी दुर्घटना टळल्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून वारंवार ट्रेन दुर्घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच वृंदावन रेल्वे स्टेशन पासून सुमारे 800 मीटर पुढे एका मालगडीचे 25 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर बिहार मधील मुजफ्फरपुर मध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती मात्र या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.