विद्यापीठात लवकरच सुरू होणार सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 63 व्या वर्षात पदार्पण केले असून विज्ञान विषयात रस वाढवण्यासाठी ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ च्या कामाला गती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठीच्या या प्रकल्पात सात गॅलरी सोबतच एमपी थ्रीएटर असलेले हे कक्ष 28 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने सर्वांसाठी खुले करण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभारण्यात येणारे हे कक्ष विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

विद्यापीठाकडून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कसाठी 25 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. यासाठी तत्कालीन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांनी दहा कोटींची मंजुरी दिली होती. त्याचबरोबर आतापर्यंत विद्यापीठाला आठ कोटींचे अनुदान मिळाले आहे. विद्यापीठ परिसरात नियोजित सायन्स पार्कसाठीची इमारत आता पूर्णतःवास आली असून राज्य शासनाने प्रयोगशाळा फर्निचर खरेदीसाठी दोन कोटी तर वैज्ञानिक उपकरणे खरेदीसाठी तीन कोटींची मान्यता दिली आहे. या पार्कचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवलेकर यांनी विज्ञान तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर यांच्यासोबत प्राध्यापक अधिकाऱ्यांची समिती तयार करून कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मूलभूत विज्ञानाचे महत्त्व आणखी वाढले आहे. अशा काळात शालेय काळापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात या हेतूने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठातील अनेक ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणात या पार्कची भर पडेल.’ असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेकर यांनी सांगितले.

एमपी थ्रीएटर हा वैज्ञानिक करमणूक दालन, डॉ. सी. व्ही. रमन गॅलरी, डॉ. हरगोविंद खुराना गॅलरी, सर जे जे बोस गॅलरी, हेरिटेज गॅलरी, सुश्रुत गॅलरी, वैज्ञानिक शोधांच्या संकल्पना पोस्टर मॉडेल द्वारे साजरीकरण या सुविधा यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे 25 कोटीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून केंद्राकडून 8 कोटींची मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत सायन्स टेक्नॉलॉजी पार्क इमारतीसाठी 5 कोटींचा खर्च आलेला असून प्रयोगशाळा फर्निचर साठी 2 कोटी, वैज्ञानिक उपकरणांसाठी 3 कोटी तर आणखी 10 कोटी ची गरज भासत आहे.

Leave a Comment