जोर लगा के हैशा….; प्रवाशांनी चक्क खाली उतरत विमानाला मारला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रस्त्यावरून जात असलेल्या बंद गाडीला धक्का मारताना अनेकांना पाहिलं असेल. खास करून एसटी बसला होय. कारण थंडीच्या महिन्यात गाड्या लवकर सुरु होत नाहीत. त्याचे व्हिडिओही सोशल मिडीयावर बघितले असतील. मात्र, एखाद्या विमालाच धक्का मारावा लागला तर काय होईल. तुमचा यावर विश्वास बसत नाही ना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यामध्ये प्रवाशी चक्क विमालाच धक्का देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सर्वात हटके अशा या विमानाला धक्का मारतानाच्या व्हिडीओची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडिओत नेपाळमधील एका विमान दाखवण्यात आले असून त्या बंद असलेल्या तारा एअरलाईन्सच्या 9N-AEV या विमानाला 20 ते 25 प्रवाशी धक्का मारताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/reel/Cng9wK_o9Qi/?utm_source=ig_web_copy_link

सोबतच या विमानाच्या व्हिडिओला थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटातील अमीर खानचे गाणे ‘हे भगवान है कहा रे तू…,’ हे गाणे देण्यात आलेले आहे. या व्हिडिओतून नेपाळ येथील विमानसेवेची असलेली दयनिय अवस्था दाखवण्यात आलेली आहे. “यस्तो छ नेपाली हवाई क्षेत्रको अवस्था” असे व्हिडिओवर लिहण्यात आलेले आहे.