व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोयना धरणातील पाणीसाठा 90 पार; अजून ‘एवढ्या’ TMC पाण्याची गरज 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 62 मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही 90 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून 14 टीएमसी पाण्याची गरज आहे.

पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे पिकांना फायदा होत आहे. त्याचबरोबर धरणातही पाण्याची सावकाशपणे आवक होत आहे. तरीही अनेक प्रमुख मोठी धरणे शंभर टक्के भरतील का? याविषयी साशंकता आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजाला ३२ आणि महाबळेश्वरला ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करतात कोयनेला ३८३३ तर नवजा येथे ५५०६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वर येथे ५२५८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस पडतोय. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ७४८३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ९०.४६ टीएमसी झाला होता. गेल्या काही दिवसापासून धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.