मराठा समाजातील तरूणांना मालक करण्याचे अण्णासाहेब पाटील महामंडाळचे काम : नरेंद्र पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मराठी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत व्यावसायिकता उभी राहिली पाहिजे. केवळ नोकरी नव्हे तर मराठी मुलांनी व्यावसायिक, मालक झाले पाहिजे. यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, त्यासाठी प्रत्येक मराठा समाजातील तरूणांला मदत केली जाईल. मराठा समाजातील तरूणांना बळ देण्याचे काम अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ काम करत असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढले.

कराड येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक धनाजी शिंदे मित्र परिवार व अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या वतीने कॅप्टन खाशाबा दाजी शिंदे कुस्ती संकुलात सत्कार समारंभ व महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, उद्योजक सचिन भोसले, मोहनराव चव्हाण, दीपक कदम, अनिल जाधव, अशितोष माने, धनंजय पाटील, उत्तम कणसे, राहुल फडतरे, धनाजी जाधव, तानाजी पाटील, भीमराव काका, सचिन नलवडे, विनायक जाधव, नवनाथ पाटील, संभाजी थोरात, राजेंद्र शेवाळे, प्रा. पाटील, उद्योजक राजू शेवाळे व कार्यकर्ते उपस्थित होते.