हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुबईतील एक अत्यंत भव्य आणि लक्झरी हॉटेल, बुर्ज अल अरब, हे जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल म्हणून ओळखले जाते. वाळवंटाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या या हॉटेलचे वास्तुशिल्प एका पारंपारिक अरब धो बोटीसारखे दिसते. हे जुमेराह ग्रुपच्या मालकीचे आणि सरकारी नियंत्रणाखालील असून , हॉटेलची उंची 321 मीटर आहे, आणि ते मानवनिर्मित बेटावर स्थित आहे. तर चला या 10 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
तब्बल 1अब्ज डॉलर्स खर्च –
बुर्ज अल अरब हॉटेल 1999 मध्ये पूर्ण झाले आणि त्याच्या बांधकामासाठी तब्बल 1अब्ज डॉलर्स खर्च आला होता . आज या हॉटेलची किंमत अंदाजे 8644 कोटी रुपये आहे. येथे 199 लक्झरी डुप्लेक्स सुइट्स उपलब्ध आहेत, डुप्लेक्स सुइट्स म्हणजे दोन मजल्यांची असलेली सुइट्स, ज्यामध्ये वरच्या आणि खालील मजल्यांमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात. हे सुइट्स अत्यंत आलिशान आणि आरामदायक आहेत, जेथे अतिथींना लक्झरी सुविधा, मोठे बेडरूम, बसायला आरामदायक जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर विलासी गोष्टींचा अनुभव मिळतो.ज्यामध्ये अतिथींना खाजगी समुद्रकिनारे, तलाव आणि आरामदायी टेरेसचा आनंद घेता येतो.
रोल्स रॉयस द्वारे हॉटेलमध्ये प्रवेश –
ही वास्तू जगातील सर्वोत्तम लक्झरी आणि भव्यतेचे प्रतिक आहे. तसेच जे लोक राजेशाही थाट अनुभवू इच्छित आहेत, त्यांना हेलिकॉप्टर किंवा रोल्स रॉयस द्वारे हॉटेलमध्ये प्रवेश करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी किती खर्च –
तुम्हाला या हॉटेलमध्ये एक रात्र राहायचे असेल, तर त्यासाठी तब्बल 10 लाख रुपये द्यावे लागतील. बुर्ज अल अरब हे एक प्रगत आणि भव्य हॉटेल आहे, जे त्याच्या अतिशय लक्झरी सुविधांसाठी आणि आलिशान अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला आरामदायक अनुभव हवा असेल, तर हे हॉटेल नक्कीच तुमच्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे.