….नाही तर मी आत्महत्या करेल; जरांगे पाटलांच्या सभेत तरुणाने घातला गोंधळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. आजच्या सभेतील जरांगे पाटलांचे धडाकेबाज भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले होते. मात्र, याच सभेवेळी भर मंचावर एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. ज्यामुळे सभेत खळबळ माजली. शेवटी पोलिसांनीच या तरुणाला मंचावरून उचलून खाली नेले. नक्की काय घडला प्रकार चला जाणून घेऊयात..

काल मराठा आरक्षणासाठी मुंबईत एका 45 वर्षे व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आजच्या सभेत या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंचावर सर्वजण उभे राहिले होते. गोंधळ घालणारा तरुण देखील मंचावरच उपस्थित होता. यावेळी अचानक तो पुढे आला आणि त्याने मनोज जरांगे पाटील यांच्या हातातून माईक हिसकावून घेतला. यानंतर, “मला बोलुद्या नाही तर मी आत्महत्या करेल” असे या तरुणाने म्हणले. ज्यामुळे मंचावर गोंधळ उडाला. मनोज जरांगे आणि इतर कार्यकर्त्यांनी या तरुणाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी पोलिसांनी मंचावर येऊन या तरुणाला उचलून खाले नेले. हा सर्व प्रकार अवघ्या काही 10 मिनिटांमध्ये घडला. मात्र यामुळे मंचावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अद्याप या तरुणाने असा गोंधळ का घातला? त्याला नेमके काय बोलायचे होते हे समोर आले नाही. सध्या पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, आजच्या सभेत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात रोखठोक भाषण केले. त्याचबरोबर, “लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको. मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण ही एकच मागणी आमची आहे. आता सरकारला दिलेला वेळ देखील संपला आहे. आता सुट्टी नाही, आता आरक्षण घ्यायचं आहे” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणले.