औरंगाबाद | २२ वर्षीय तरुणीने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु सुदैवाने तिचा जीव वाचला. ही तरुणी वैदयकिय शिक्षण घेत होती. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी रस्ताने जाणार्या एका तरुणाची मदत घेऊन तिला बाहेर काढले.
ही घटना शुक्रवारी साडेआठच्या सुमारास घडली आहे. हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचे प्राण तातडीने सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखून वाचवले आहे. ही तरुणी एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिकत होती. तरुणी तिच्या भाऊ आणि वडिलांसोबत राहत असून ती २२ वर्षाची होती.
एमबीबीएसच्या अंतिम वर्षात एक विषय बॅक राहिल्यामुळे तरुणी डिप्रेशन मध्ये गेली होती. म्हणून तिने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. असे असले तरीही “वडीलांनी टेन्शन घेऊ नको ” आणखी दोन वर्षे लागली तरी लागु देत असे बजावले होते. परंतु तिने हर्सूल तलाव गाठत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी सुरक्षा रक्षकासह दामिनी पथकाने सुद्धा धाव घेत तीला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तीचा जीव वाचला.