औरंगाबाद : वाळुज वाहतूक शाखेचे पोहे पंढरीनाथ एकनाथ साबळे हे मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कामगार चौकात आपले कर्तव्य बजावत असताना, शुभम सोमनाथ बेरे, वैभव नानासाहेब लोखंडे, धनराज पेरे हे सर्व रा. पाटोदा या गावाचे रहिवासी आहे.( दुचाकी mh.20.Bp.5937) वरून ट्रिपल सीट चालले होते.
त्यावेळी साबळे यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता, तुम्ही आम्हाला विनाकारण परेशान करताय म्हणून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यातील दोन जणांनी साबळे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी बाजूला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र तिघेही ऐकण्यास तयार नव्हते.
त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना पकडून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनसी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाटोदा गावातील पुढाऱ्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत गावातील तरुणांनी विरुद्ध तक्रार देऊ नका असे म्हणत वाहतूक पोलिसांवर दबाव टाकला. मात्र तिघांविरुद्ध एनसी दाखल करण्यात आली.