… तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे मात्र तत्पूर्वीच G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केल आहे. काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे तर फुल्ल टाइम अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर आमचा विरोध राहील असं त्यांनी म्हंटल.

NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो. पण जो कोणी अध्यक्ष होईल तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी फॉर्म भरला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणुका पारदर्शीपणे पार पडाव्यात, असत मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तरी गेहलोत यांना काही काळ राजस्थानचे मुख्यमंत्रीपद कायम ठेवायचे आहे, अशा चर्चा सुरु होत्या. याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक गेहलोत एक ज्येष्ठ नेते आहेत, चांगले नेते आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अजून ठरवायचे आहे. मात्र त्यांना दोन्ही पदांवर कायम राहायचे असेल तर आमचा विरोध असेल. काँग्रेसचे प्रमुख होणे हा काय पार्ट टाइम जॉब आहे का? असा सवालही त्यांनी केला.