मनोज जरांगे पाटील आरक्षणापासून राहणार वंचित? कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांनी उठवलेल्या एका आवाजामुळे सरकारने ठोस पाऊल उचलत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले. मात्र अशातच जरांगे पाटील यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात उभे राहिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्याच कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नाहीये.

राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अंतरवाली गावात एकही कुणबी नोंद आढळली नाहीये. तसेच, जरांगे यांच्या कुटुंबात देखील एकही कुणबी नोंद मिळालेली नाही. ही बाब शिंदे समितीने आतापर्यंत ज्या नोंदी शोधल्या त्यातून समोर आली आहे. मुख्य म्हणजे, ज्या गावातून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्याच गावात एकही कुणबी नोंद मिळालेली नाही. तसेच, जरांगे यांच्या देखील कोणाची कुणबी नोंद मिळालेली नाही. त्यामुळे आता खुद्द मनोज जरांगे मराठा आरक्षणापासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अद्याप मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे 20 जानेवारी रोजी मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मात्र हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न सरकारने केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या घरांना वेढा घालू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.