हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची गुड न्यूज मिळणार आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (DA) वाढ मिळण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच याबाबत घोषणा करू शकते, या घोषणेची अनेक कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांचा मोठा फायदा होणार आहे. तर चला या DA ची गणना कशी केली जाते आणि याची घोषणा कधी होणार आहे, याबदल सविस्तर माहिती आणून घेऊयात .
DA ची गणना –
7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत DA ची गणना AICPI (All India Consumer Price Index) च्या आधारे केली जाते. यावेळी जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून DA किती वाढवायचा हे ठरवले जाणार आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये DA मध्ये 3% वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्या वेळी AICPI निर्देशांक 144.5 वर होता. जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हा निर्देशांक 145 च्या आसपास राहिला, तर जानेवारी 2025 मध्ये DA 56% पर्यंत पोहोचेल.
पेन्शनधारकांनाही वाढीचा फायदा –
DA मध्ये 3% वाढ झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगार मोठ्या प्रमाणावर वाढेल. सध्या DA 53% आहे. जर सरकारने 3% वाढ जाहीर केली, तर हा 56% होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चांगला फरक दिसून येईल. पेन्शनधारकांनाही या वाढीचा फायदा होईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 असेल, तर सध्याचा DA 9,540 आहे. 3% वाढ झाल्यास हा DA 10,080 होईल. म्हणजेच, 540 ची मासिक वाढ होईल.
महागाई भत्त्याची प्रक्रिया –
7 व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार, महागाई भत्त्याची (DA) प्रक्रिया वर्षातून दोन वेळा केली जाते , ती म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात. जानेवारी 2025 साठी DA वाढीचा निर्णय जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीतल्या AICPI (All India Consumer Price Index) निर्देशांकाच्या सरासरीवर आधारित असणार आहे. सरकार मार्च 2025 मध्ये या वाढीची अधिकृत घोषणा करू शकते, आणि ही घोषणा होळीच्या आधी होण्याची शक्यता आहे. जर हि वाढ झाली तर DA वाढीचा पैसा कर्मचाऱ्यांच्या मार्च किंवा एप्रिलच्या पगारात समाविष्ट होऊ शकतो.