Saturday, January 28, 2023

Fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान!! ‘या’ 19 खतांवर बंदी; खरेदी करू नका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरीप (Fertilizer)आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील एकूण १९ खतांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आहे .शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय.

रब्बी हंगामाच्या (Fertilizer) पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने हे अप्रामाणीत आढळल्याने ही खाते विक्री करण्यावर संपूर्ण राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बंदीनंतर शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे असून ही खत खरेदी करण्याचा टाळलं गेलं पाहिजे.

IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

- Advertisement -

कोणकोणत्या खतांचा समावेश – (Fertilizer)

बंदी घातलेल्या या खतांमध्ये जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक, एस एस पी के पी आर, ऍग्रो केम, यासह विविध 19 खतांचा समावेश आहे.