Wednesday, February 8, 2023

पुरुषांनी कधीही सांगू नयेत ‘ही’ 3 गुपिते; अन्यथा करावा लागेल पश्चाताप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीत स्त्री- पुरुषांना सुखी जीवनासाठी अनेक चांगले सल्ले दिले आहेत. चाणक्यांच्या नीतीचे पालन करून अनेकांनी जगावर राज्य केले आहे. त्यांनी मानवाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्त्वे दिली आहेत. पुरुषांनी आपली काही गुपिते इतरांना सांगू नयेत नाहीतर मोठा पश्चाताप करावा लागेल असं त्यांनी सांगितलं आहे. आज आपण जाणून घेऊया अशी कोणती 3 गुपिते आहेत जी पुरुषांनी कधी उघड करू नयेत….

बायकोची तक्रार –

नवरा बायको मधील कोणत्याही गोष्टी असल्या तरी त्या दोघातच राहिल्या पाहिजेत. पती- पत्नीने एकमेकांचे दोष इतरांना सांगू नयेत. समजा जर पती आपल्या पत्नीशी संबंधीत काही नकारात्मक गोष्टी दुसऱ्यासोबत शेअर करत असेल तर लोक पत्नीचीही थट्टा करतात. आणि भविष्यात जर पत्नीच्या स्वभावात सुधारणा झाली तर मात्र तुम्हीच चेष्टेचा विषय बनू शकता. त्यामुळे नवरा बायकोने इतरांपुढे एकमेकांची तक्रार किंवा चुकीची माहिती देऊ नये.

पैशाचे झालेले नुकसान –

- Advertisement -

चाणक्यनीती नुसार, जर तुमचं कधी आर्थिक नुकसान झालं तर कधीही ही गोष्ट कोणत्या बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका. याचे कारण म्हणजे तुमचं दुःख ऐकून ती व्यक्ती काय तुम्हाला आर्थिक मदत वगैरे करणार तर नाहीच, याउलट तुमचं नुकसान झालं आहे, तुमच्याकडे आता पैसे नाहीत असं समजून ती व्यक्ती तुम्हालाच त्यांच्या आयुष्यातून लांब करण्याची शक्यता अधिक असते.

आपलं दुःख आणि अडचण –

जेव्हा आपण कधी संकटात असतो किंवा दुःखात असतो तेव्हा आपण मन मोकळं करण्यासाठी इतर कोणाला तरी त्याबाबत सांगतो. परंतु चाणक्यनीती नुसार, जगातील कोणत्याही व्यक्तीला तुमच्या अडचणींशी काहीही देणेघेणे नसते. उलट तुमच्यासमोर उभ्या असलेल्या संकटावरून पाठीमागे तुमची थट्टा करणारेच भरपूर जण असतात.