शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात ‘या’ 3 भाज्या; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्वी गावरान भाज्या आणि पौष्टिक जेवण लोकांना मिळायचे. मात्र आजकाल सगळं काही हायब्रीड झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांपेक्षा आज कालच्या लोकांची प्रतिकार क्षमता ही खूप झाली आहे. ही प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात की, हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात खात जा. मात्र आजकालचे लोक पिझा, बर्गर, चाट यासारख्या पदार्थाचे सेवन करतात. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. असे वेगवगळे पदार्थ खाल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ म्हणून ते गणले जाते. मग यांना बाहेर काढण्यासाठी करायचे काय? तर यांना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला या तीन भाज्याच फायद्याच्या ठरू शकतात. त्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

१) पांढरा भोपळा

पांढरा भोपळा हा तुमच्या शरीरातील पाणी, खाणं आणि हवेच्या माध्यमातून निर्माण झालेले विषारी घटक शरीरातून बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हिवाळ्यात या भाजीचे सेवन केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. आयुर्वेदात पांढरा भोपळा हा औषध म्हणून उपयोगी पडतो. त्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी भोपळ्याच्या ज्युस पिल्यास आतडे आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते, मेंदूचं काम सुधारतं, वात-पित्त दोष दूर होतात. त्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही यामुळे मदत होते. त्यामुळे भोपळा हा तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

२) आलं

आपल्याला जेव्हा सर्दी, खोकला होतो तेव्हा आपण आल्याचा वापर करतो. तसेच भाजीला चव येण्यासाठीही आल्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे पोटासाठीही फायदेशीर आलं ठरते. आल्याचा वापर आहारात केल्यामुळे तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, श्वासाची समस्या दूर होते, अस्थामा, लठ्ठपणा आणि आतड्यांची सफाई होते. त्यामुळे प्रत्येक जेवणाआधी आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाल्ला तर तुमचे पोट साफ राहील. तसेच आल्यामुळे पित्ताची समस्याही दूर होते.

३) शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगा या अनेकांना आवडत नाहीत. मात्र ही भाजी तुमच्या पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते. शेवग्यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतर पौष्टिक तत्व भरपूर असतात.  त्यामुळे याचा आहारात वापर केल्यास पोटाच्या समस्या दूर होतात. तुम्हाला पोटाच्या समस्या दूर करायच्या असतील तर तुम्ही शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजीचं सेवन करू शकता. यामुळे तुमचे आरोग्य सुदृढ राहील.