हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात अनेक कार उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कंपनी आपल्या लेटेस्ट अपडेट सह आणि वैशिष्ट्यांसह नवनवीन कार सातत्याने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होतील. प्रवासासाठी अगदी परवडणाऱ्या या गाड्यांबाबत पाहूनच घेऊ..
Hyundai Venue N-Line-
ह्युंदाई कंपनीची ही गाडी ६ सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. कंपनीच्या N लाइनअपमधील ही दुसरी कार आहे, याआधी कंपनीने i20 सादर केली आहे. ह्युंदाईची हि SUV स्पोर्टी लूकसह येईल आणि यामध्ये एक मजबूत इंटीरियर देखील दिसू शकेल. या SUV मध्ये 30 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स आहेत.
Toyota Urbana Cruiser HyRyder-
टोयोटाची ही SUV 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाईल.टोयोटा हायरडर एसयूव्हीला एक दमदार एसयूव्ही म्हणून आणले गेले आहे. ज्यात आकर्षक डिझाइन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनने तयार केले आहे. इंजिन आणि पॉवर मध्ये टोयोटाने या एसयूव्ही मध्ये सेल्फ इंजिन चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनला दिले आहे. या एसयूव्ही मध्ये ५ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचे ऑप्शन दिले आहे.
Kia Sonet X Line-
ऑटोमेकर कंपनी Kia India आपली Kia Sonet X Line सप्टेंबर महिन्यात लॉन्च करेल. ही कार किया सॉनेटचे पुढील व्हर्जन असेल. भारतातील Kia Sonet एकूण चार इंजिन ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. Kia Sonet X Line भारतीय बाजारपेठेत मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा पंच यांसारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी स्पर्धा करेल.
Maruti Grand Vitara-
मारुती Grand Vitara ही हायब्रीड कार सप्टेंबरमध्ये लॉन्च होऊ शकते. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. मारुती ग्रँड विटाराची एक्स शोरूम किंमत 9.50 लाख रुपयांपासून 18 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार ग्राहकांना दोन पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध होत आहे. यात, माईल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड यांचा समावेश आहे.
Mahindra XUV 400-
महिंद्राची ही गाडी बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक SUV ८ सप्टेंबरला लॉन्च होईल. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स, चांगले इंटिरियर पाहायला मिळतील. महिंद्राची हि कार अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून या Tata Nexon EV ला तगडी फाईट देईल. नुकतंच आनंद महिंद्रा यांनी या गाडीचा टिझर शेअर केला आहे.