हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्यातील कित्येक लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपल्याला रेल्वेच सर्वात सोपा मार्ग वाटते. हीच रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक मोफत सुविधा पुरवते. या सुविधा प्रवाशांना माहीत नसल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. या सुविधा नेमक्या कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया.
मोफत प्राथमिक उपचार
एखाद्या प्रवाशाची प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास रेल्वेकडून मोफत प्राथमिक उपचार दिले जातात. यासाठी तुम्ही तिकीट कलेक्टर, ट्रेन अधीक्षक किंवा अन्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकता. प्रवाशाची प्रकृती अधिक गंभीर असल्यास पुढील थांब्यावर वैद्यकीय उपचार सेवा ही दिली जाते.
मोफत जेवण
प्रीमियम ट्रेन (राजधानी, दुरांतो, शताब्दी) 2 तासांपेक्षा अधिक उशीर झाल्यास रेल्वेकडून प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. याशिवाय, रेल्वे ई-कॅटरिंग सर्व्हिसच्या माध्यमातूनही ट्रेनमध्ये तुमच्या पसंतीचं जेवण ऑर्डर करता येतं.
लॉकर रूमची सुविधा
काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर क्लोकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध असते. येथे आपल्याला एका महिन्यापर्यंत सामान सुरक्षित ठेवता येते.
वेटिंग हॉल
रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी वेटिंग हॉलची सुविधा देखील पुरवते. प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील AC व नॉन-AC वेटिंग हॉल मोफत वापरता येतात. यासाठी फक्त रेल्वेचे तिकीट दाखवावे लागते.