हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |आजकाल प्रत्येक घरामध्ये स्मार्टफोन असतो स्मार्टफोन शिवाय लोकांचे लोकांच्या दिवसाची सुरुवात देखील होत नाही. स्मार्टफोन मध्ये आपण सोशल मीडियासह अनेक ॲप्स देखील डाऊनलोड करत असतो. हे ॲप डाऊनलोड केल्यावर आपण ते चालू करताना ते ॲप आपल्या स्मार्टफोनच्या अनेक परवानगी घेत असतो. आणि आपण घाईघाईमध्ये त्या परवानगी देत देखील असतो. परंतु हेच ॲप्स आपल्या फोनमधील काही माहिती चोरत असतात. काय त्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
त्यातील सगळ्यात महत्त्वाचा ॲप म्हणजे ट्रू. कॉलर प्रत्येक लोकांच्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलर हा ॲप घेतात. कारण हा ॲप जर अनोळखी नंबर असेल, तर तो नंबर कोणाचा आहे. याबद्दल माहिती देतच असतात. त्याचप्रमाणे काही ॲप्स किराणामाल भाजीपाला वस्तू खरेदी करण्यासाठी असतातच सोशल मीडिया ॲप्स असतात. जेव्हा आपण हे ॲप्स स्मार्टफोन मध्ये चालू करतो. तेव्हा ते तुमचे मेसेजेस, लोकेशन कॉन्टॅक्ट लिस्ट मागतात. आणि आपण त्यांना परवानगी देखील देत असतो.
अशातच ट्रू कॉलर हे ॲप्स स्वीडन मधील ट्रू सॉफ्टवेअर स्कॅनडे नेव्ही या कंपनीने तयार केलेले आहे. कॉल संबंधित माहिती देणारा हा एक ॲप आहे. जर तुम्ही एखाद्या सोशल मीडिया अकाउंटवर तुमचा मोबाईल क्रमांक टाकला तरी तो ट्रू कॉलरकडे जातो तसेच एपीआय आणि एसडीके हे वेगवेगळे कम्प्युटर प्रोग्राम असून याच्या मदतीने ट्रू कॉलर फोन क्रमांक ओळखतो.
या ट्रू कॉलर ॲपचा वापर अनोळखी कॉलच्या माहितीसाठी होतो. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा कॉल येत असेल तर ट्रू कॉलरमध्ये तुम्हाला त्या युजरचे नाव समजते. जेव्हा आपण हे ट्रू कॉलरचे ॲप इंस्टॉल करतो. त्यावेळी हे ॲप आपले मेसेज कॉल डिटेल कॉन्टॅक्ट लिस्ट याची परवानगी देखील मागत असते. अगदी बँकेच्या तपसीलांपासून ते कॉन्टॅक्टची लिस्ट ट्रू कॉलर कडे जाते. त्यामुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो हे ॲप वापरू नका. आणि वापरले तरी त्या ॲपला देणाऱ्या परवानगी चेक करून द्या.