अतिशय महत्वाचे! आता ‘या’ व्यक्तींना घरबसल्याच करता येणार मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेट (Postal voting) मतदान सेवा आणली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन लाईनमध्ये थांबून मतदान करण्याची गरज पडणार नाही. ही सेवा नक्की काय आहे? या सेवेचा कोणत्या व्यक्तींना लाभ घेत आहे हे आपण जाणून घेऊया.

देशामध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केंद्र सरकारकडून मतदान केंद्रावर वेगवेगळ्या सोयी राबवल्या जातात. मतदान करताना कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ नये मतदान केंद्रावर वाद होऊ नये अशा गोष्टींची काळजी सरकारकडून घेतली जाते. मात्र अनेक वेळा मतदान केंद्रावर गर्दी असल्यामुळे तसेच अचानक निर्माण झालेल्या वादामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो. तसेच प्रकृती ठीक नसल्यामुळे उतरत्या वयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही.

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसमोर येणाऱ्या या सर्व अडचणींचा विचार करून पोस्टल बॅलेट सेवा आणली आहे. या सेवेचा लाभ 85 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तींना घेता येऊ शकतो. परंतु 85 पेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना मतदान केंद्रात जाऊन मतदान करावे लागणार आहे. 85 वयापेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टाद्वारे मतदान करता यावे यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमध्ये 85 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना पोस्टाद्वारे मतदान करता येईल हे सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशात 1.85 कोटी मतदार 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या 2.38 लाख इतकी आहे. त्यामुळे या नागरिकांसाठी पोस्टल बॅलेट सेवा राबवली जाणार आहे. यामध्ये, जे मतदार पोस्टल बॅलेटचा पर्याय निवडतात, त्यांच्या घरी मतदान अधिकारी जातो. त्या मतदाराला पोस्टल बॅलेटमध्ये मतदान करता येते. ही प्रक्रिया राजकीय पक्षांनी दिलेल्या माहितीनंतर आणि व्हिडिओग्राफी करूनच पार पडते.