नवरात्रीत हमखास बनवले जातात ‘हे’ खास बंगाली पदार्थ; देवी दुर्गासाठी बनतो विशेष भोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वर्षभरापासून वाट पाहत असलेला नवरात्रोत्सव येत्या 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. हा उत्सव तब्बल नऊ दिवस साजरी केला जातो. याकाळात देवी दुर्गाची पूजा करण्यात येते. नवरात्रोत्सवाला सर्वात जास्त मान पश्चिम बंगालमध्ये दिला जातो. याठिकाणी 9 दिवस अतिशय खास पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात नवरात्र साजरी केली जाते. विशेष म्हणजे, 9 दिवस देवी दुर्गाची पूजा करून तिला दररोज वेगवेगळे भोग चढविले जातात. या 9 दिवसाच्या काळात प्रत्येक बंगाली कुटुंबाच्या घरी नऊ विविध खास असे पदार्थ बनवण्यात येतात. आज आपण याच विशेष पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत.

भोग म्हणजे काय?

बंगालमध्ये भोग हा एक प्रसाद आहे जो सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथीला देवी दुर्गाला अर्पण करण्यात येतो. यानंतर हाच प्रसाद भक्तांमध्ये देखील वाटला जातो. या प्रसादांमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर करत नाही. सात्विक पद्धतीने तयार केलेल्या या प्रसादात खिचडी, चोरचोरी, चटणी, बेगन भाजा, लुची, पायेश, मिष्टी डोई किंवा रसगुल्ला अशा स्वादिष्ट बंगाली खाद्यपदार्थांचा समावेश असतो.

बंगाली खिचोरी

बंगाली खिचोरी ही मूग डाळ, तांदूळ आणि काही खास मसाले घालून बनवली जाते. खिचुरी विशिष्ट अश्या गोविंद भोग भातापासूनच बनवली जाते. अनेक लोक उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रकारच्या तांदळाची खिचुरी बनवतात. मात्र गोविंद भोग तांदूळ खास भोग बनवण्यासाठी वापरला जातो. बंगाली खिचोरी ही नवरात्रीच्या काळात देवीच्या प्रसादासाठी बनवण्यात येते तशीच ती सणासुदीच्या काळात देखील बनवली जाते.

चोरचोरी

चोरचोरी ही एक बंगाली मिश्रित व्हेज डिश आहे. जी बटाटे, पालक, भोपळा, मुळा आणि इतर भाज्यांच्या मिश्रणाने बनविली जाते. ही स्वादिष्ट चोरचोरी बंगाली कुटुंबांमध्ये आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. खास म्हणजे ही रेसिपी नवरात्रीच्या काळात हमखास करण्यात येते.

बंगाली चालेर पायेश

चालेर पायेश म्हणजे तांदळाची खीर असते जिला देवीच्या भोगासाठी सर्वात प्रथम बनवण्यात येते. ही खीर बनवण्यासाठी देखील गोविंदभोग तांदळाचा वापर केला जातो. दुधात वेलची, ड्रायफ्रूट्स आणि साखर घालून भात शिजवून हा स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो. ही खीर देवीला प्रसाद म्हणून चढवली जाते.

रसगुल्ला

रसगुल्ला बंगालचा मुख्य गोड पदार्थ आहे. प्रत्येक सणासुदीच्या काळात रसगुल्ला बंगाली कुटुंबात बनवला जातो. विशेष म्हणजे नवरात्रीच्या काळात तर देवीला भोग चढवताना रसगुल्ला हमखास तयार केला जातो. या पदार्थाला फुटलेले दूध, साखर, वेलची वापरून बनवण्यात येते. यानंतर त्याचे लहान लहान गोळे साखरेच्या पाकात टाकले जातात.

बेगुनी भाजा

बेगुनी भाजा ज्याला बोलक्या भाषेत वांग्याचा भजिया असे समजू म्हणले जाते. हा पदार्थ देखील देवीला भोग म्हणून चढविला जातो. बेसनमध्ये काही मसाले टाकून मीठ टाकून, त्यामध्ये वांग्याचे काप टाकले जातात. यानंतर हे काप तेलात तळून बेगुनी भाजा ही रेसिपी तयार करण्यात येते. हे खास पदार्थ नवरात्रीच्या काळात देवीला भोग म्हणून बनवण्यात येतात तसेच बंगाली कुटुंबांमध्ये देखील आवडीने बनवले जातात.