मतदानाच्या दिवशी ‘या’ गोष्टींचे पालन करायलाच हवं; चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात उद्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी मतदान होईल हे उद्याच समजेल. मतदान हा आपला हक्कच नव्हे तर मुख्य कर्तव्य आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जाते आणि या लोकशाहीत मतदार (Voter) हाच खरा राजा मानला जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत असे काही मतदार असतील जे त्यांच्या आयुष्यात प्रथमच मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. अशा मतदारानी मतदानाच्या दिवशी काय करावं? याबाबतचे काही मार्गदर्शक तत्त्वे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर (Voting Poll) जाल, तेव्हा त्याठिकाणी पुरुष, महिला आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी वेगवेगळ्या रांगा पाहायला मिळतात. मतदान करताना शारीरिकदृष्ट्या अपंग आणि गर्भवती महिलांना प्राधान्य दिले जाते. प्रत्येक मतदाराला 3-4 जणांच्या ग्रुप मध्ये बोलावले जाते. सर्वात आधी तुमचं मतदान ओळखपत्र मतदान अधिकाऱ्याकडे पडताळणीसाठी सादर करा. तुमच्याकडे जर ओळख स्लिप असेल तरीही चालेल.

मतदान करताना बोटाला शाई लावली जाते. शाई लावलेलं बोट याचा अर्थ तुम्ही मतदान केलं आहे हे सिद्ध करते. त्यामुळे तुमच्या डाव्या बोटावर मतदान अधिकाऱ्याकडून शाई लावून घ्या, त्यानंतर तुमचा सीरिअल नंबर रजिस्टरमध्ये नोंदवला जाईल आणि तुमची सही घेतली जाईल.

यानंतर शेवटची प्रोसेस म्हणजे, तुमची मतदार स्लिप मतदान अधिकाऱ्याला द्या. हि स्लिप पाहून तुम्हाला मतदान पेटीकडे पाठवलं जाईल.प्रत्येक मतदार त्यांच्या रेकॉर्ड केलेल्या अनुक्रमांकाच्या क्रमाने पुढे जातो. मग तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या चिन्हापुढील बटन दाबून धरा..