मोठी बातमी! सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार असणार नवे निवडणूक आयुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज नवे निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu) आणि ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नियुक्त केले आहे. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आयुक्ताच्या दोन जागा रिकाम्या होत्या. अशातच अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्यामुळे पंतप्रधानांच्या समितीचे या दोन निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती (Election Commissioners) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. यापूर्वी अनेकवेळा निवडणूक आयोग त्यांच्या नियुक्तीसाठी समितीच्या बैठका पार पडल्या होत्या. अखेर आज या समितीने निवडणूक आयुक्तांच्या पदी दोन नावांची घोषणा केली आहे. या दोन नावांमध्ये सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार यांचा समावेश आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्थापित करण्यात आलेल्या समितीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे अधीर रंजन चौधरी यांनी यावर टीका केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, “या समितीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश असायला हवा होता. गेल्या वर्षी सरकारने केलेल्या कायद्यामुळे ही समिती एक औपचारिकता ठरली आहे. या समितीमध्ये सरकारचे बहुमत असल्यामुळे ते काहीही करू शकतात.” अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेले ज्ञानेश कुमार केरळचे आहेत. तर सुखबीर संधू पंजाबचे आहेत. ज्ञानेश कुमार 1988 बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी राहिले आहेत. तर सुखविंदर संधू उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. आता या दोन्ही अधिकाऱ्यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.