Satara News : पंकजा मुंढेंच्या स्वागतावेळी चोरट्यांचा 15 तोळे दागिन्यांवर डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभर शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली जात आहे. ही यात्रा आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे सकाळी दाखल झाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप नेत्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 3 जणांच्या गळ्यातील जवळपास 15 तोळ्याचे दागिने लंपास केले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे आज फलटण शहरामध्ये यात्रेचे आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबतात कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गर्दी केली. गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने भाजपा डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे यांच्या गळ्यातील 4 तोळ्याची सोन्याची चेन, सांगवी (फलटण) महादेव कदम यांची तब्बल 10.5 तोळ्याची चेन, पत्रकार पोपटराव मिंड यांची 1 तोळ्याची चेन लंपास केली.

भाजप नेत्या मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा पुढे जाताच काही वेळेनंतर संबंधिताच्या लक्षात ही बाब आली. यावेळी त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. मात्र, अज्ञात चोरटा सापडला नाही. उपस्थित काही कार्यकर्त्यांनी काढलेले फोटो तसेच व्हिडिओ तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.