2024 या वर्षात ही 3 गाणी ठरली सुपरहिट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाण्याच्या प्रभावामुळेच चित्रपट पाहण्याचा उत्साह वाढत असतो . त्यामुळे असं म्हणता येईल कि , 2024 वर्ष लोकांसाठी अतिशय संगीतमय ठरले आहे. याच वर्षात बऱ्याच बॉलिवूड गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक गाण्यांनी तर लोकांच्या मनाला भुरळ घातली असून , ज्याच्या त्याच्या तोंडावर या गाण्यांची चर्चा होताना दिसत आहे. या बॉलिवूडच्या टॉप हिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकण्यासोबतच सोशल मीडियावर जोरदार चर्चेची ठरली आहेत . तर चला 2024 या वर्षात प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणाऱ्या गाण्याची माहिती पाहुयात.

तौबा तौबा –

बॅड न्यूज या हिंदी चित्रपटातील हे सुपर हिट गाणं , करण औजला यांनी लिहिले आणि गायले आहे. हे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आहे.
या गाण्यात विकी कौशल यांचे एनर्जेटिक डान्स मूव्ह्ज आणि त्रिप्ती डिमरी यांची अदा यामुळे याला जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच बिलबोर्ड इंडिया आणि यूके आशियाई चार्टवर हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले. त्याचसोबत त्याने कॅनडियन हॉट 100 बिलबोर्डवर 25 व्या क्रमांकावर पदार्पण केले आहे. हे गाणं रिलीजच्या काही दिवसांतच व्हिडिओ यूट्यूबवर 70 दशलक्षांहून अधिक वेळा पाहिलं गेले आहे. तसेच हे गाणं पंजाबी पारंपरिक शैलीचा आणि आधुनिक डान्स बीट्सचे सुंदर मिलन आहे, ज्यामुळे हे गाणं पार्टी अँथम म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

सजनी रे –

भारतातील ऑस्कर 2025 साठी निवडलेल्या लापता लेडीज या चित्रपटातील हे गाणं असून, अर्जित सिंग या गायकाने पुन्हा एकदा लोकांचे मन मोहून टाकले आहे. तसेच हे गाणं राम संपथ यांनी लिहले आहे. या गाण्याच्या बोलांमध्ये प्रियकराच्या दूरतेमुळे होणाऱ्या वेदना आणि दुःख व्यक्त केलं आहे. या गाण्याचे संगीत आणि भावनिक गायन यामुळे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. म्हणून या गाण्याला 2024 च्या टॉप गाण्यांमध्ये गणले जात आहे. तसेच हे गाणं हिंदी भाषेतील असून याने प्रेक्षकांच्या मनावर भावनिक भूरळ टाकली आहे.

आयी नाई –

आयी नाई गाणं 2024 साली आलेल्या स्त्री 2 चित्रपटातील एक सुपर हिट सॉंग असून , राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. त्यामुळे या गाण्यामध्ये वेगळीच धमाल दिसून येत आहे. तसेच पवण सिंग, सिमरन चौधरी, दिव्या कुमार आणि साचिन-जिगर यांच्या गाण्याने गाण्याला एक खास ऊर्जा दिली आहे, आणि साचिन-जिगर यांनी त्याच्या धूनवर जोरदार बीट्स दिल्या आहेत. त्याचसोबत हे गाणं नॉन-स्टॉप पार्टीसाठी फार भन्नाट आहे. या गाण्याची धून आणि रिदम फारच पकडणारी असून , ज्यामुळे ते नृत्य प्रेमींमध्ये लोकप्रिय झालं आहे.