डिसेंबर महिन्यात होणार हे जबरदस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना सुरू आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही बेस्ट पर्याय उपलब्ध झाले आहेत. येत्या 8 डिसेंबर रोजी स्मार्टफोन क्षेत्रात Realme GT 5 Pro लाँच होणार आहे.  तसेच, इतरही अनेक स्मार्टफोन कंपन्यांकडून लॉंच करण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची माहिती.

Realme GT 5 Pro

8 डिसेंबर रोजी भारतात Realme GT 5 Pro लॉन्च करण्यात येईल. या फोनमध्ये कंपनीने अनेक खास फीचर्स दिले आहेत. जसे की, 5400 mAh बॅटरी, Snapdragon 8 Gen 3 SOC आणि 4500 nits चा पीक ब्राइटनेस अशा गोष्टी आपल्याला फोनमध्ये मिळू शकतात. Realme GT 5 Pro या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 90hz चा रिफ्रेश रेट आणि 6.6 इंच डिस्प्ले मिळणार आहे. तसेच, नवीन मॅजिक रिंग विचार देखील या फोनमध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेला चीनमध्ये लॉन्च करण्यात येईल. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी याला भारतात लॉन्च करण्यात येईल.

Redmi 13C

तुम्ही जर स्मार्टफोन बाजारात इतरही पर्याय शोधत असाल तर Redmi 13C हा पर्याय देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. Redmi 13C हा स्मार्टफोन 6 डिसेंबर रोजी बाजारांचा लॉन्च होणार आहे. यामध्ये आपल्याला 6.74 इंच डिस्प्ले, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी मिळणार आहे. त्यामुळे Redmi 13C ही तुम्ही नव्या वर्षात खरेदी करू शकता.

Infinix Hot 40

9 डिसेंबर रोजी Infinix Hot 40 हा स्मार्टफोन देखील Infinix कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला अनेक खास फीचरबरोबर MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पुढे हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.