यंदा दिवाळीत ST कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये बोनस मिळणार; शिंदे सरकारची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 6 हजार रुपयांचा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यावर्षी या बोनसमध्ये 1 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. खरे तर यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 15 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. परंतु त्या ऐवजी एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये बोनस देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक एसटी कर्मचारी नाराज असल्याचे दिसत आहे.

मुख्य म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी परिवहन महामंडळाला निधी वितरित केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर, आता याच एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये बोनस सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे काही एसटी कर्मचारी नाराज आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बोनसमुळे यांना कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

दरम्यान, दिवाळीमध्ये सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 15000 रुपये बोनस जाहीर करावा अशी मागणी एसटी संघटनांनी शिंदे सरकारकडे केली होती. मात्र ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही. त्याऐवजी सरकार ने कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच, महामंडळाने कर्मचाऱ्यांचा पगार लवकर करावा यासाठी सरकारने 378 कोटींचा निधी वितरित केला आहे.