Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ‘ही’ Electric कार; कुठे होतेय विक्री??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. भविष्याच्या दृष्टीने अनकेजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. तस पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीही काही कमी नाहीत, पण आज आम्ही तुम्हाला अशा गाडीबाबत सांगणार आहोत ज्याची किंमत सॅमसंगच्या मोबाईल पेक्षाही कमी आहे. होय, या इलेक्ट्रिक गाडीचे नाव आहे K5. या गाडीला electricKarने लॉन्च केलं आहे.

40 किमी पेक्षा जास्त टॉप स्पीड

कंपनीने हा इलेक्ट्रिक कार क्वाड्रिसायकल रूपात लॉन्च केली आहे. या कारमध्ये दोन लोक बसण्याची क्षमता आहे. electricKar K5 चा टॉप स्पीड 40 किमी/ता पेक्षा जास्त असल्याची नोंद आहे, कंपनीने असाही दावा केला आहे की एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 52km ते 66km धावते. तसेच या गाडीला पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तासांपेक्षा कमी वेळ लागतो. सध्या चीनमध्ये अलीबाबाच्या माध्यमातून ही कार विकली जात आहे.

सॅमसंगच्या टॉप मॉडेल फोनपेक्षाही गाडीची किंमत कमी-

या कारची किंमत सॅमसंगच्या टॉप मॉडेल फोनपेक्षा कमी आहे. सॅमसंगने अलीकडेच Galaxy Z Fold 4 लॉन्च केला आहे. भारतात त्याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 1,85,000 रुपये आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक कार यापेक्षा कमी किमतीत सादर केली आहे. या कारची किंमत फक्त $2,100 (सुमारे 1,65,000 रुपये) ठेवण्यात आली आहे, म्हणजेच त्याची किंमत सॅमसंगच्या Galaxy Z Fold 4 च्या किमतीपेक्षा कमी आहे. सध्या ही कार भारतात विकली जात नाही. भारतात जेव्हा ही कार लॉन्च केली जाईल तेव्हा ती नेमकी कितीला विक्री करतील याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. परंतु सध्या तरी चिनी लोक या गाडीचा आनंद घेत आहेत हे मात्र नक्की….