भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि उत्तम मायलेजमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. यामुळे अनेक कंपन्या हाय-टेक फीचर्ससह इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर्स बाजारात आणत आहेत. पर्यावरणपूरक, खर्चिकदृष्ट्या फायदेशीर आणि प्रदूषणमुक्त असल्याने इलेक्ट्रिक वाहने भविष्यात आणखी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
Ultraviolette Tesseract ला लाँच होताच मोठा प्रतिसाद
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी Ultraviolette ने नुकतीच भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘Tesseract’ लाँच केली आहे. लाँचिंगनंतर अवघ्या काही दिवसांतच या स्कूटरला तब्बल 50,000+ बुकिंग्स मिळाली आहेत. कंपनीने आता अतिरिक्त 30,000 बुकिंग्ससाठी नोंदणी सुरू केली आहे. स्कूटरची किंमत ₹1.20 लाखांपासून सुरू होते, जी तुमच्या नजीकच्या शोरूमनुसार बदलू शकते. डिलिव्हरी 2026 च्या पहिल्या तिमाहीपासून सुरू होईल.
शक्तिशाली बॅटरी आणि मोटर परफॉर्मन्स
3 बॅटरी पर्याय – 3.5 kWh, 5 kWh आणि 6 kWh
शक्तिशाली 20.1 BHP इलेक्ट्रिक मोटर
34L अंडरसीट स्टोरेज – पूर्ण हेल्मेट सहज बसू शकते
तीन रंगांचे पर्याय – डेझर्ट सँड, सोनिक पिंक आणि स्टील्थ ब्लॅक
टेसेरॅक्टच्या हाय-टेक वैशिष्ट्ये
ब्लाइंड स्पॉट डिटेक्शनसाठी ड्युअल रडार कॅमेरे
ओव्हरटेक अलर्ट आणि टक्कर अलर्ट सिस्टम
ड्युअल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प विथ फ्लोटिंग DRLs
14-इंच अलॉय व्हील्स
डिस्क ब्रेक सेटअप (पुढील व मागील बाजूस)
ड्युअल-चॅनेल ABS ब्रेकिंग सिस्टम
ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल
भविष्यातील बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर?
Tesseract ही परफॉर्मन्स, सेफ्टी आणि हाय-टेक फीचर्सचा उत्तम मिलाफ असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि प्री-बुकिंगचा विक्रमी आकडा पाहता, ही स्कूटर भारतीय बाजारात नवा बेंचमार्क प्रस्थापित करू शकते. तुम्हीही तुमच्या पुढील इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Tesseract निवडणार का?