हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून ते पुढील 10 दिवस कोल्हापूर-मिरज आणि पुणेदरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिरज व सांगली या ठिकाणी दुहेरीकरण झाल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, इतर काही गाड्या अन्य मार्गाने वळविल्या गेल्या आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक बदल्यामुळे तसेच काही गाड्या रद्द झाल्यामुळे कुडची, उगार, रायबाग, घटप्रभा, गोकाकसह इतर प्रवाशांना याचा त्रास होणार आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून 25 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत गाडी क्रमांक 17415 तिरुपती-कोल्हापूर रेल्वे बेळगावपर्यंत धावणार आहे. तसेच, बंगळूर-मिरजला जाणारी राणी चन्नमा एक्स्प्रेस गाडी क्रमांक 16589 रेल्वे बेळगावपर्यंत धावणार आहे. तसेच, 26 डिसेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत कोल्हापूर – तिरुपती आणि मिरज-बंगळूरला जाणाऱ्या दोन्ही गाड्या बेळगाव रेल्वे निघणार आहेत. पुढील दहा दिवस या दोन्ही गाड्या बंद राहणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.
दरम्यान दहा दिवस रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे कुडची, उगार, रायबाग, घटप्रभा, गोकाकसह प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तिरुपती किंवा बंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांना बेळगाव स्थानकावरून गाडी पकडावी लागणार आहे. तसेच बेळगावला जाण्यासाठी खाजगी वाहनात व बसचा उपयोग करावा लागेल. ज्यामुळे खर्च देखील जास्त होईल आणि वेळ देखील वाया जाईल.